Posts

Showing posts from October 12, 2020

सोमवार 12 October 2020

 आज दिवसभर वीज नाही. मुंबई मध्ये पुरवठा विभागात तांत्रिक बिघाड असल्याने अजून वीज सुरळीत झाली नाही. गरजेचे पाणी आणून ठेवले आहे पिण्याचे. बाकी विद्युत विभाग आपलं काम करेलच. मेल वर ऑफिसच काम आवश्यक तेवढं झालं.  इशावस्य उपनिषद हिंदी भावार्थ वाचन झालं. त्याचं कृतींतर होण्यास थोडा काळ जावा लागेल. दैनंदिन चक्रात थोडासा बदल झाला. चांगलाच होता.  संकल्पना केवळ विचारात असतील तर त्यांचं आयुष्य फार थोडं असतं. वागण्यात आल्या तर आपल्या तर होतातच पण त्याचा संसर्ग पण होतो. आणि कदाचित त्या आपल्या भौतीक आयुष्यापेक्षा अनेकपट जगतात.