Posts

Showing posts from October 16, 2020

अमावस्या पुरूषोत्तम मास २०२०

पावसाने शेतीचं झालेलं नुकसान मनाला लागलं. पीक विमा मिळावा आणि रब्बी मध्ये हे नुकसान भरून निघावं. उत्पन्नाच्या अन्य स्रोताशिवाय शेती कठीण आहे सध्या. आज नित्यनियमात तर्पण होतं आणि अमावास्येचा उपवास आहे. उद्या घटस्थापना. नवरात्र म्हणजे उत्साह असतो. देवीची, शक्तीची उपासना. दसरा आणि दिवाळी सगळंच यंदा घरून संपन्न करावं लागणार आहे. चित्त शांत आणि अष्टवधानी ठेऊन परिस्थिती अनुरूप सर्व साजरे करू. बदल बाह्य जगतात अंतर जगत स्थिर आहे. संयम चिकाटी ठेवणच सद्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. मानवी आयुष्यात अशी परिस्थिती येणं फारसं निराळं नाही. बाबा एक गोष्ट नेहमी सांगायचे की गोष्टी होत नाहीत त्या घडवाव्या लागतात. खूप पटतो हा विचार. आणि ऊदयुक्त करतो.