10 डिसेंबर 2020
आज चहा पिऊन आशु सोबत बाहेर गेलो भाजी आणायला. भोपळा फसला चांगला नाही निघाला. अक्कल खाती जमा. आल्यावर अंघोळ केली. एक मीटिंग झाली आणि लाइट गेले. मग बराच वेळ काम नाही झालं. तिनला लाइट आले मग काम सुरू केलं. संध्याकाळी भडंग आणि लाडू असा बेत होता. आज अथर्व आणि कणादचे कपडे आले. धुवून वापरायला काढावे. आजचा विचार - अपरिहार्यतेला सहज आनंदाने सामोरे जाणं अंगी बनवायला हवं.