Nov 27, 2020

आज अशुचा वाढदिवस होता. पियू ताईने घरी केक बनवला. छान झाला होता. जेवणात गुलाब जमून होते. काम रेग्युलर होतं. आज दोरीवरच्या उड्या नाहीं मारल्या. रात्री अमितचा फोन आला. तो आणि अमर सोबत होते. अमितच्या आयुष्यातील घडामोडीवर बोललो. मागच्या दोन वर्षात त्यांनी बहीण आणि भाऊ गमावले. अकस्मात. काळ कठोर असतो. आणि तो थांबत नाही. मृत्यू लोकाची अटळ वास्तविकता आहे. आता, पायथ्याला भेटू असं बोललो. बघू कधी योग येतो ते. आजचा विचार - जे राहत ते ज्ञान, कर्म त्याचं प्रात्यक्षिक. न गुरफटणे. नित्य अनित्य भान आवश्यक.