डोंगरे गुरुजी
आज डोंगरे गुरुजींच्या जाण्याची बातमी मनास रुखरुख लावून गेली. मोठे थोर आहेत तोपर्यंत त्यांच्या छायेत बालपणासारखा आनंद असतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता आज व्यक्त करून आज पूर्णविराम. डोंगरे गुरुजींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. मठातल्या शाळेत त्यांच्या राज्यात बिगरी ते तिसरी ही पाच वर्ष काढली. हाडाचे शिक्षक एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. बालाजी अनकल्ले आला नाही तर उचलबांगडी करायला आम्हाला पाठवायचे. तुमच्या घरी ज्या चिमण्याचे गळे काळे आहेत तो मी आहे, तुम्ही कशे वागता ते बघत आहे असं सांगायचे. विद्यार्थ्यांनी च लिहिलं तर चंद्र वाचून मार्क देणारे गुरुजी. बालवाडीच्या पोरांनीही चूक दाखवली तरी त्याला शाबासकी देऊन चूक सुधारणारे गुरुजी. माहीत नसलेल्या प्रश्नाला उद्या सांगतो म्हणून पुन्हा उद्या सांगणारे गुरुजी. मुलांना निसर्ग, इतिहास माहीत व्हावा म्हणून बालवाडीतल्या पोरांना रांगेत चालत सोमनाथपुरला, शेळकी डॅमला सहल नेणारे गुरुजी. विज्ञान माहीत व्हावं म्हणून दूध डेरीत सहल नेणारे गुरुजी. जोमाने लेझीम वर ताल धरायला लावणारे गुरुंजी. एवढं सगळं करून हेंडगा वृत्तपत्र चालवणारे गुरुजी. एवढ्या तळमळीचे गुरुजी उभ्या ...