It was a loaded day, meetings, data analysis, discussions, rca, debugging all started at 10, continued till midnight. Caught up whatsapp and its time for sleep.
आदल्या दिवशी दोरीवरच्या उडयाचा व्यायाम केला, तर सकाळी उठायला थोडे प्रयत्न जास्त लागतात. १० ला संगणक उघडला. मीटिंगस, कॉल्स, आणि प्रकल्प नियोजन यात दहा वाजले. काढा केला, लिंबू, जिरे, खनिज मीठ, लवंग, मिरे, तुळशीची पावडर, कडीपत्ता हे सर्व वापरले. प्रथमेश सद्या इकडे असल्याने सात कप. सकळसाठी पण थोडासा काढा उरतोच. आज बाहेरची एक चक्कर झाली किरकोळ खरेदी आणि ATM साठी. मीटिंगमुळे आज मी अष्टकात नव्हतो. ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही अशांचा प्राधान्यक्रम आधी ठेवला तर वेळापत्रक थोडं सुटसुटीत होतं. बघायचं.
आज मंदारचा वाढदिवस असतो, 1 डिसेंबर. सकाळी बोललो त्याच्याशी.कणाद बोलला. नंतर टीनूशी बोललो, मावशीच्या तब्येतीविषयी. गुढगेदुखीसाठी 3 महिने गोळ्या व्यायाम सांगितला आहे. दिवसभर मीटिंगस, कॉल्स असे चालू होते. रात्री मंदारकड केक कापला. दहिवडे होते. त्याच्या गच्चीवर चकरा मारल्या. घरी आल्यावर काम केलं. आता झोपेची वेळ झाली आहेथोडा उशीर झालाय. आजचा विचार - असा वेळ जेव्हा काहीच करायचं नाही, कधी येईल माहीत नाही. पण व्यस्त वेळत, मनाचा निवांतपणा असावा.
अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि अथर्वचा वाढदिवस असा योग होता. बाहेर एक फेरफटका झाला. अथर्वला आणि कणादला पेन आणलं. अभिरामला पहिल्यांदा पाहिलं. शांत आहे बाळ. अमय छान गुजराती शिकलाय. नवल आहे तीन महिन्यांत नवीन भाषा शिकला तो. पियू ताई आणि प्रथमेश धावती भेट देऊन गेले. अथर्वसाठी केक बनउन आणला ताईंनी. संध्याकाळी औक्षण आणि केक कटिंगच whtsapp प्रक्षेपण झालं. दिवसभरात अथर्वला बरेच फोन झाले. ओंकार दिल्लीला पोहोचलाय. काम सुरू झालयं त्याचं. उद्या बोलतो त्याला.
Comments