संकष्टी चतुर्थी अधिक मास २०२०
अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि अथर्वचा वाढदिवस असा योग होता. बाहेर एक फेरफटका झाला. अथर्वला आणि कणादला पेन आणलं.
अभिरामला पहिल्यांदा पाहिलं. शांत आहे बाळ. अमय छान गुजराती शिकलाय. नवल आहे तीन महिन्यांत नवीन भाषा शिकला तो.
पियू ताई आणि प्रथमेश धावती भेट देऊन गेले. अथर्वसाठी केक बनउन आणला ताईंनी. संध्याकाळी औक्षण आणि केक कटिंगच whtsapp प्रक्षेपण झालं. दिवसभरात अथर्वला बरेच फोन झाले.
ओंकार दिल्लीला पोहोचलाय. काम सुरू झालयं त्याचं. उद्या बोलतो त्याला.
Comments