१४ ऑक्टोबर २०२०

 आज ९ च्या दरम्यान लॅपटॉप उघडला. १२ ला जेवण. ४ ला चहा. ५ ला अल्पाहार. १० ला जेवण. आणि या सर्वांमध्ये काम झालं.

आज दिवसा पाऊस होता. हैदराबाद, उदगीर, सोलापूर या भागात पावसाचा चांगलाच जोर आहे. कमी दाबाच्या पट्यामुळे बंगालच्या उपसागरातील वादळ पाऊस घेऊन मुंबईकडे येतंय. बऱ्याच वर्षात झाला नसेल असा पाऊस या भागात होतोय. वादळाचं असं  या मार्गाने येणं पण फार कमी किंबहुना नोंदीत पाहिल्यांदाच होतंय. या वर्षात बरंच काही अद्वितीय घडतंय. पिकं थोडक्यात काढून झाली आहेत बहुतेक भागांत. नाही झाली त्यांचं नुकसान आहे. बघूया उद्या कसा असतो जोर पावसाचा इथं.

आजचं थोडं काम वेळेअभावी उद्यावर ढकललं आहे. आठवड्याच्या मधोमध आणि कमी महत्वाचं काम थोडं रेटलं जाणारच. कधी पुनविराम कधी स्वल्पविराम. काळभैरवकडून शिकण्यासारख्या लकबी.

Comments

Popular posts from this blog

Thought train

Friendship

Absolute and Relative