घटस्थापना २०२०

 शनिवार असल्याने थोड्याशा निवांतपणेच दिवसाची सुरुवात झाली. नवरात्र पूजा झाली, नंदादीप लावला. संध्याकाळी मंदारकडं गेलो. मुलं आणि मंदार क्रिकेट खेळले. आईबरोबर अष्टकं म्हणली. 

बिनीतानी ढोकळे केले होते, येताना अशुसाठी दिले.  अशूला बिनीताचे ढोकळे आवडतात. 

कणादचं निरीक्षण खूप छान आहे. घरी आल्यावर हात साबणाने धुतले आणि वाफारा घेतला त्यानं न सांगता. घरी आल्यावरही अष्टकं म्हणली. आईची आणि अशुचि अष्टकं थोडी वेगळी आहेत.

आज दिवसा केनोपनिषद वाचायला घेतलं आहे. गुरू शिष्य संवाद ही या उपनिषदाची पार्श्वभूमी आहे. सर्व उपनिषदांप्रमाणेच हे पण गहन आहे. केन या शब्दाने या उपनिषदाची सुरुवात होते म्हणून हे केनोपनिषद म्हणून ओळखले जाते. 

प्रथम श्लोकात वाणी, मन, प्राण, नेत्र, कर्ण हे सर्व कोणाच्या प्रेरणेने संचालित होतात साधारण असा प्रश्नाचा भावार्थ आहे. याचं पूर्ण वाचन मनन या आठवड्यात करावं.

अष्टकं: 











Comments

Popular posts from this blog

Thought train

Friendship

Absolute and Relative