ऐतवर द्वितीया नवरात्र २०२०

आज १२ वाजेपर्यंत जेवण झालं होतं. आज किल्ला हा २०१४ चा मराठी सिनेमा पाहून झाला सकाळी झी ५ वर. सर्वांनी पाहण्यासारखा आहे. कथानक फारसं वेगळं नाही, पण चित्रीकरण सुरेख आहे. कोकणातलं निसर्गसौंदर्य आणि राहणीमान ११ वर्षाच्या मुलाच्या दृष्टिकोनातून चित्रित केलं आहे. सकाळी साधारण एक तास आणि जेवणानंतर राहिलेला भाग बघितला.
आज अथर्वला सोबत घेऊन संध्या केली. संध्याकाळी अष्टकं म्हणली. कणाद प्रत्येक सष्टांगे करितो प्रणाम चरणा कडव्याबरोबर देवीच्या फोटोसमोर दंडवत घालतो. आज अथर्वनिपण सोबत दिली त्याला.
दुपारी केनोपनिषदाचं वाचन झालं.
आता गाडी झोपाण्यापर्यंत आली आहे. काढा करावा.आणि पडावं.

Comments

Popular posts from this blog

Dec 01, 2020

संकष्टी चतुर्थी अधिक मास २०२०

बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०