बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०

आदल्या दिवशी दोरीवरच्या उडयाचा व्यायाम केला, तर सकाळी उठायला थोडे प्रयत्न जास्त लागतात. १० ला संगणक उघडला. मीटिंगस, कॉल्स, आणि प्रकल्प नियोजन यात दहा वाजले. 
काढा केला, लिंबू, जिरे, खनिज मीठ, लवंग, मिरे, तुळशीची पावडर, कडीपत्ता हे सर्व वापरले. प्रथमेश सद्या इकडे असल्याने सात कप. सकळसाठी पण थोडासा काढा उरतोच.
आज बाहेरची एक चक्कर झाली किरकोळ खरेदी आणि ATM साठी.
मीटिंगमुळे आज मी अष्टकात नव्हतो. 
ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही अशांचा प्राधान्यक्रम आधी ठेवला तर वेळापत्रक थोडं सुटसुटीत होतं. बघायचं.

Comments

Popular posts from this blog

Nov 16, 2020

Absolute and Relative

Time, Timing & Making Things Happen