दिवाळी 2020

 आज अभ्यंगस्नान, फराळ, दुपारी आई मंदार आल्यावर जेवण असा बेत होता.

आज जवळ जवळ वर्षांनंतर गरम पाण्याने अंघोळ होती. केवडा साबण होता अंघोळीला. 

https://www.kviconline.gov.in/khadimask/singleproduct.jsp?PRODUCTID=10205

बदल छान होता. 

मुलांबरोबर संध्या आणि श्रीसूक्त हवन केलं.

दुपारी लक्ष्मी सिनेमा बघितला. साऊथ पटडीतील भीतीपट विनोद मिश्रण आहे. 

संध्याकाळी लक्ष्मीपूजन, आरती, केली. या वेळी फटकड्या उडवल्या नाहीत. अमय दुपारी मुलांबरोबर खेळत थांबला होता. त्याला घ्यायला मंदार आला तेव्हा त्यांच्याकडच्या पूजेलाही जाऊन आलो.

घड्याळजी मंडळीं येत आहेत उद्या. 

आज सिनेमा बघितला ना त्यावरून एक विचार आला. की खास करून हिंदी सिनेमे हे सगळे प्रेमपट का असतात. खऱ्या आयुष्यात असं नसत. नटी आणि नट यांच्या गुतूर गुतुरला का भव्य दिव्य दाखवलं जातं. एक तर आपण सगळे किंवा सिनेमावले कुणीतरी मनोविकारग्रस्त आहोत. काहीतरी बिघडलंय. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही ही ओळ फक्त खरी आहे.

मानवी आयुष्यात सार्थकतेचे अनेक पैलू आहेत. आणि ते जास्त महत्वाचे आहेत. एवढं मोठं भाव विश्व असताना आपण का ते प्रामाणिकपणे उलगडत नाही?

आजचा विचार - व्यक्त अव्यक्त या पसाऱ्यात व्यक्तता ही निर्भीड असलेली अव्यक्तता आहे. व्यक्तता ओबडधोबड असली तरी त्यातूनच सुंदर शिल्प जन्म घेऊ शकतं.



Comments

Popular posts from this blog

Thought train

Friendship

Absolute and Relative