Nov 04, 2020

आज संकष्टी. साडेदहा ते साडेनऊ काम झालं. उपवास साडेनऊला सोडला.

आज दोरीवरच्या उड्या नाही मारल्या. 

बातम्यांमध्ये US निवडणुकांचा गोंधळ सुरू आहे. 

आज सकाळी अर्णब गोस्वामीच्या अटकेची बातमी होती. खेचाखेची सगळी बघून गंमत वाटते. खुजे लोक जास्त झालेत सगळ्याच क्षेत्रात. 

काही नवीन बनण्याची प्रक्रिया वाढत्या चंद्रकले प्रमाणे असायला हवी. रोज प्रगतिशील. शेवटी कृष्णार्पण म्हणण्यातच शहाणपण आहे. शिल्लक ही बोधातच आहे.

आयुष्यात काही केल्यापेक्षा काही केले नाही त्याचीच सल जास्त जाणवते म्हणून करण्यात कासराई सोडायची नाही असा शिरस्ता पकडायचा आहे.

Comments

Popular posts from this blog

Thought train

Friendship

Absolute and Relative