Nov 12, 2020

 आज बराच व्यस्त दिवस होता. नवीन प्रोजेक्ट live झाला. कधीतरी field deployment करायची होती ती आज केली. सुधारणा होत राहतील. वापर सुरू झाला.

आज दिवाळीचा पहिला दिवस वासू बारस. फराळाचे प्रकार घरी बनत आहेत रोज. उद्या पूर्ण होतील.

दिवणजींशी बोललो. दिवाण गुरुजी मागच्या महिन्यात गेले. त्यांच्याबद्दल बोलणं झालं. गुरुजींनी जवळ जवळ ४थी पर्यंत शिकवलं. त्यांची एक शैली होती. शिकवण्याची शिस्त होती. त्यांच्या शिकवणीमध्ये मस्त पैकी चिंचेच्या झाडावरील चिमण्या मोजण्यात आणि गप्पांमध्ये शिकण्यात छान वेळ जायचा. आनंदी बागडायचे दिवस होते ते. त्यांच्या आठवणी ही एक आयुष्याची शिदोरीच आहे.

आज गिट्टूशीही बोललो. कोरोना झालाय त्याला आणि वहिनींना. 14 दिवस झाले आता बऱ्यापैकी आटोक्यात आहे. बाकी काळजी घेणे आणि औषध घेणे हेच आपल्या हातात असतं. बकीही गप्पा झाल्या त्याच्याशी. 

मुलांनी आज किल्लाही बनवलाय दिवाळीचा. तो असा



जर तरच्या पलीकडे निश्चीत निर्णय घेणे आणि त्यात निमग्नपणें कार्यरत होणे यात आनंद आहे. 

Comments

Popular posts from this blog

Saturday, 30th December 2023

Friendship

Time, Timing & Making Things Happen