Dec 18, 2020, Friday

 आज दुपार एक वाजता अरविंदरावांची कोविडची टेस्ट केली. उद्या रिपोर्ट येतील. उद्या डॉक्टरांना भेटू. 

बाकी ऑफिसचे मीटिंगस, कॉल्स, थोडी बहुत कोडींग यात दिवस गेला.

आज दोरीवरच्या उड्या मारल्या. १५०.

बिनीताने उधीयु हा भाजीचा गुजराती प्रकार करून पाठवला होता. छान होती झाली. सगळ्यांना आवडला.

आवळा लिंबू काळं मीठ आलं यांचा काढा केला. आता गाडी झोपायपर्यंत आली आहे.

आजचा विचार - जे घडतं ते घडवतो म्हणलं की ओझं होतं, आणि ते तसं नसतं, ते घडतच असतं, आपण साक्षी असतो, ओझं वाहायचं काही कारण नाही.

Comments

Popular posts from this blog

Thought train

Friendship

Absolute and Relative