Nov 08, 2020

 रविवार. सकाळी प्रथमेशसाठी अँटिबायोटिक्स आणल्या. Amox+Clox हे combination बऱ्याच शोधानंतर एका दुकानात मिळालं.

हर्षद मेहता सिरीयस बघितली एपिसोड 3 पर्यंत. त्या काळातील घडामोडी पाहून लहानपणीच्या वातावरणाचा गंध जाणवला. काळ बदलला तरी माणसाच्या स्वभावातील गुण दोष तसेच रहातात.

स्वनिल सर आणि पियू ताई आले आज. प्रथमेशचा अर्धा आजार आई बाबांना बघून पळाला. बाकी nebulization ने बराच फरक पडला. आता कणादचं नाक वाहातय.

दुपारी एक डुलकी झाली. संध्याकाळी सूप केलं. थाई vegitables, टोमॅटो. ठीक होतं.

नितीकथांचं पुस्तक दोन गोष्टी वाचून दाखवल्या कणाद आणि अथर्वला. त्यांचं मराठी चांगलं व्हावं यासाठी बरीच उठाठेव करवी लागणार आहे. दोरीच्या उड्या मारल्या अथर्व बरोबर. 

Thought of the day:

मोठ्या लक्षासाठी छोटी छोटी पावले टाकत राहणे महत्वाचे आहे.

Comments

Popular posts from this blog

Thought train

Friendship

Absolute and Relative