Nov 25, 2020
आज सकाळी थंडी जाणवली. कावळे सात तर चिमण्या आठ पर्यंत किलबिलाट करतात. नंतर वाहनांची गजबजाहट सुरू होते.
आवरून नित्य साधना करून साडेदहा होतात काम सुरू करायला.
आज थोडा गोंधळ होता. पण ते चालायचं.
स्वप्नील सर, पियू ताई आणि प्रथमेश आज आले. आशुचा वाढदिवस आणि त्यांची सुट्टी असा योग.
संध्याकाळी नेहमीचं लिंबू, सैंधव मीठ, आलं असं गरम पाणि बनवलं. लोकडाऊन मध्ये ती सवय कायम आहे. आज इतर मसाला घेतला नाहीं.
आजचा विचार - कर्म धर्म संयोगाने गोष्टी घडतात. आपण सजग संवहनशील राहणं महत्त्वाचं. ॐ
Comments