Posts

ऐतवर द्वितीया नवरात्र २०२०

आज १२ वाजेपर्यंत जेवण झालं होतं. आज किल्ला हा २०१४ चा मराठी सिनेमा पाहून झाला सकाळी झी ५ वर. सर्वांनी पाहण्यासारखा आहे. कथानक फारसं वेगळं नाही, पण चित्रीकरण सुरेख आहे. कोकणातलं निसर्गसौंदर्य आणि राहणीमान ११ वर्षाच्या मुलाच्या दृष्टिकोनातून चित्रित केलं आहे. सकाळी साधारण एक तास आणि जेवणानंतर राहिलेला भाग बघितला. आज अथर्वला सोबत घेऊन संध्या केली. संध्याकाळी अष्टकं म्हणली. कणाद प्रत्येक सष्टांगे करितो प्रणाम चरणा कडव्याबरोबर देवीच्या फोटोसमोर दंडवत घालतो. आज अथर्वनिपण सोबत दिली त्याला. दुपारी केनोपनिषदाचं वाचन झालं. आता गाडी झोपाण्यापर्यंत आली आहे. काढा करावा.आणि पडावं.

घटस्थापना २०२०

Image
 शनिवार असल्याने थोड्याशा निवांतपणेच दिवसाची सुरुवात झाली. नवरात्र पूजा झाली, नंदादीप लावला. संध्याकाळी मंदारकडं गेलो. मुलं आणि मंदार क्रिकेट खेळले. आईबरोबर अष्टकं म्हणली.  बिनीतानी ढोकळे केले होते, येताना अशुसाठी दिले.  अशूला बिनीताचे ढोकळे आवडतात.  कणादचं निरीक्षण खूप छान आहे. घरी आल्यावर हात साबणाने धुतले आणि वाफारा घेतला त्यानं न सांगता. घरी आल्यावरही अष्टकं म्हणली. आईची आणि अशुचि अष्टकं थोडी वेगळी आहेत. आज दिवसा केनोपनिषद वाचायला घेतलं आहे. गुरू शिष्य संवाद ही या उपनिषदाची पार्श्वभूमी आहे. सर्व उपनिषदांप्रमाणेच हे पण गहन आहे. केन या शब्दाने या उपनिषदाची सुरुवात होते म्हणून हे केनोपनिषद म्हणून ओळखले जाते.  प्रथम श्लोकात वाणी, मन, प्राण, नेत्र, कर्ण हे सर्व कोणाच्या प्रेरणेने संचालित होतात साधारण असा प्रश्नाचा भावार्थ आहे. याचं पूर्ण वाचन मनन या आठवड्यात करावं. अष्टकं: 

अमावस्या पुरूषोत्तम मास २०२०

पावसाने शेतीचं झालेलं नुकसान मनाला लागलं. पीक विमा मिळावा आणि रब्बी मध्ये हे नुकसान भरून निघावं. उत्पन्नाच्या अन्य स्रोताशिवाय शेती कठीण आहे सध्या. आज नित्यनियमात तर्पण होतं आणि अमावास्येचा उपवास आहे. उद्या घटस्थापना. नवरात्र म्हणजे उत्साह असतो. देवीची, शक्तीची उपासना. दसरा आणि दिवाळी सगळंच यंदा घरून संपन्न करावं लागणार आहे. चित्त शांत आणि अष्टवधानी ठेऊन परिस्थिती अनुरूप सर्व साजरे करू. बदल बाह्य जगतात अंतर जगत स्थिर आहे. संयम चिकाटी ठेवणच सद्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. मानवी आयुष्यात अशी परिस्थिती येणं फारसं निराळं नाही. बाबा एक गोष्ट नेहमी सांगायचे की गोष्टी होत नाहीत त्या घडवाव्या लागतात. खूप पटतो हा विचार. आणि ऊदयुक्त करतो.

A quiet day

 Routine meetings and work affairs occupied the major part of the day. The pending stuff from yesterday caught up. There was idli for dinner and rajma for lunch. Rajma owing to college time eating habits is closer to heart. It usually accomapanies  with hostel memories. Observing that sitting sessions during work day is elongated and need to develop more break based habits for wfh reality. During monsoon months I am addicted to follow dam level of morbe dam that supplies water to Navi Mumbai @  https://www.nmmc.gov.in/navimumbai/morbe-dam1540389919 So the farewell rains might fill it completely. A meter below capacity today. It rained moderately last night and today.  Forming our decisions based on impressions received from others might happen unconsciously. Conscious effort is required to eliminate noise and take decisions that can be truly called ours.

१४ ऑक्टोबर २०२०

 आज ९ च्या दरम्यान लॅपटॉप उघडला. १२ ला जेवण. ४ ला चहा. ५ ला अल्पाहार. १० ला जेवण. आणि या सर्वांमध्ये काम झालं. आज दिवसा पाऊस होता. हैदराबाद, उदगीर, सोलापूर या भागात पावसाचा चांगलाच जोर आहे. कमी दाबाच्या पट्यामुळे बंगालच्या उपसागरातील वादळ पाऊस घेऊन मुंबईकडे येतंय. बऱ्याच वर्षात झाला नसेल असा पाऊस या भागात होतोय. वादळाचं असं  या मार्गाने येणं पण फार कमी किंबहुना नोंदीत पाहिल्यांदाच होतंय. या वर्षात बरंच काही अद्वितीय घडतंय. पिकं थोडक्यात काढून झाली आहेत बहुतेक भागांत. नाही झाली त्यांचं नुकसान आहे. बघूया उद्या कसा असतो जोर पावसाचा इथं. आजचं थोडं काम वेळेअभावी उद्यावर ढकललं आहे. आठवड्याच्या मधोमध आणि कमी महत्वाचं काम थोडं रेटलं जाणारच. कधी पुनविराम कधी स्वल्पविराम. काळभैरवकडून शिकण्यासारख्या लकबी.

13th October 2020

   Early morning time was spent in catching up with backlog of the power outage day. Workwise it was medium load day. Couple of meetings and ongoing projects. Had lunch bit early owing to lighter dinner yesterday. Motivation early morning was around the process of perceiving. Transition from impulsive thoughts to more composed ones happens when we understand the beyond obvious terrain. Obvious terrain is obvious habitual one. The terrain beyond that is extrapolation. The barometer for maturity of thought is does it result in inner peace . Closer to reality closer to peace.

सोमवार 12 October 2020

 आज दिवसभर वीज नाही. मुंबई मध्ये पुरवठा विभागात तांत्रिक बिघाड असल्याने अजून वीज सुरळीत झाली नाही. गरजेचे पाणी आणून ठेवले आहे पिण्याचे. बाकी विद्युत विभाग आपलं काम करेलच. मेल वर ऑफिसच काम आवश्यक तेवढं झालं.  इशावस्य उपनिषद हिंदी भावार्थ वाचन झालं. त्याचं कृतींतर होण्यास थोडा काळ जावा लागेल. दैनंदिन चक्रात थोडासा बदल झाला. चांगलाच होता.  संकल्पना केवळ विचारात असतील तर त्यांचं आयुष्य फार थोडं असतं. वागण्यात आल्या तर आपल्या तर होतातच पण त्याचा संसर्ग पण होतो. आणि कदाचित त्या आपल्या भौतीक आयुष्यापेक्षा अनेकपट जगतात.