Posts

Thursday, Oct 22, 2020

 It was a loaded day, meetings, data analysis, discussions, rca, debugging all started at 10, continued till midnight. Caught up whatsapp and its time for sleep.

बुधवार, ऑक्टोबर २१, २०२०

आदल्या दिवशी दोरीवरच्या उडयाचा व्यायाम केला, तर सकाळी उठायला थोडे प्रयत्न जास्त लागतात. १० ला संगणक उघडला. मीटिंगस, कॉल्स, आणि प्रकल्प नियोजन यात दहा वाजले.  काढा केला, लिंबू, जिरे, खनिज मीठ, लवंग, मिरे, तुळशीची पावडर, कडीपत्ता हे सर्व वापरले. प्रथमेश सद्या इकडे असल्याने सात कप. सकळसाठी पण थोडासा काढा उरतोच. आज बाहेरची एक चक्कर झाली किरकोळ खरेदी आणि ATM साठी. मीटिंगमुळे आज मी अष्टकात नव्हतो.  ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही अशांचा प्राधान्यक्रम आधी ठेवला तर वेळापत्रक थोडं सुटसुटीत होतं. बघायचं.

Tuesday, October 20th 2020

It was lunch time by the time two meetings were over. Started up with some detailed planning for ongoing project. Was able to catch up first nap of the lockdown too. With no calls waking up. Looking back at the past, take aways of the experience, is always the mould of the mind. The clashes, the fights, the achievements, failures,  all fade away.  Looking at the motivational aspect, alignment to the bigger picture plays a great role. The subconscious plays a great role in the conscious.

Monday, Oct 19, 2020

 The day started with catchup of the week's work.  Calls, meetings, occupied major part of the day. Need to take some more time for focussed work. May be need phone switch off time. Or need to start day early. It is difficult to wake up for mediocre catch up, but habit maters as well. Regarding reading between the lines of translation of kenopnishad whatever can be said, heard, seen, lived, touched, breathed, can not be said to be the ultimate truth. However it is the ultimate principle, the truth, the bramhan that is the fuel for all of it. Eye of eye, speech of the speech, hearing of the hearing, life of the life, breathe of the breath, mind of the mind. Simply put it can only be indicated at through the means at our disposal. This is part one of the kenopnishad.

ऐतवर द्वितीया नवरात्र २०२०

आज १२ वाजेपर्यंत जेवण झालं होतं. आज किल्ला हा २०१४ चा मराठी सिनेमा पाहून झाला सकाळी झी ५ वर. सर्वांनी पाहण्यासारखा आहे. कथानक फारसं वेगळं नाही, पण चित्रीकरण सुरेख आहे. कोकणातलं निसर्गसौंदर्य आणि राहणीमान ११ वर्षाच्या मुलाच्या दृष्टिकोनातून चित्रित केलं आहे. सकाळी साधारण एक तास आणि जेवणानंतर राहिलेला भाग बघितला. आज अथर्वला सोबत घेऊन संध्या केली. संध्याकाळी अष्टकं म्हणली. कणाद प्रत्येक सष्टांगे करितो प्रणाम चरणा कडव्याबरोबर देवीच्या फोटोसमोर दंडवत घालतो. आज अथर्वनिपण सोबत दिली त्याला. दुपारी केनोपनिषदाचं वाचन झालं. आता गाडी झोपाण्यापर्यंत आली आहे. काढा करावा.आणि पडावं.

घटस्थापना २०२०

Image
 शनिवार असल्याने थोड्याशा निवांतपणेच दिवसाची सुरुवात झाली. नवरात्र पूजा झाली, नंदादीप लावला. संध्याकाळी मंदारकडं गेलो. मुलं आणि मंदार क्रिकेट खेळले. आईबरोबर अष्टकं म्हणली.  बिनीतानी ढोकळे केले होते, येताना अशुसाठी दिले.  अशूला बिनीताचे ढोकळे आवडतात.  कणादचं निरीक्षण खूप छान आहे. घरी आल्यावर हात साबणाने धुतले आणि वाफारा घेतला त्यानं न सांगता. घरी आल्यावरही अष्टकं म्हणली. आईची आणि अशुचि अष्टकं थोडी वेगळी आहेत. आज दिवसा केनोपनिषद वाचायला घेतलं आहे. गुरू शिष्य संवाद ही या उपनिषदाची पार्श्वभूमी आहे. सर्व उपनिषदांप्रमाणेच हे पण गहन आहे. केन या शब्दाने या उपनिषदाची सुरुवात होते म्हणून हे केनोपनिषद म्हणून ओळखले जाते.  प्रथम श्लोकात वाणी, मन, प्राण, नेत्र, कर्ण हे सर्व कोणाच्या प्रेरणेने संचालित होतात साधारण असा प्रश्नाचा भावार्थ आहे. याचं पूर्ण वाचन मनन या आठवड्यात करावं. अष्टकं: 

अमावस्या पुरूषोत्तम मास २०२०

पावसाने शेतीचं झालेलं नुकसान मनाला लागलं. पीक विमा मिळावा आणि रब्बी मध्ये हे नुकसान भरून निघावं. उत्पन्नाच्या अन्य स्रोताशिवाय शेती कठीण आहे सध्या. आज नित्यनियमात तर्पण होतं आणि अमावास्येचा उपवास आहे. उद्या घटस्थापना. नवरात्र म्हणजे उत्साह असतो. देवीची, शक्तीची उपासना. दसरा आणि दिवाळी सगळंच यंदा घरून संपन्न करावं लागणार आहे. चित्त शांत आणि अष्टवधानी ठेऊन परिस्थिती अनुरूप सर्व साजरे करू. बदल बाह्य जगतात अंतर जगत स्थिर आहे. संयम चिकाटी ठेवणच सद्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. मानवी आयुष्यात अशी परिस्थिती येणं फारसं निराळं नाही. बाबा एक गोष्ट नेहमी सांगायचे की गोष्टी होत नाहीत त्या घडवाव्या लागतात. खूप पटतो हा विचार. आणि ऊदयुक्त करतो.